Pimpri News: महापालिकेतर्फे संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर, नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील, नगरसेविका अनुराधा गोरखे, सहाय्यक आयुक्त व्यकंटेश दुर्वास, नगरसचिव उल्हास जगताप, शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते युवराज आडे, अमोल पवार, रमेश राठोड, सिताराम राठोड, रवी राठोड, संजय जाधव, दिलीप आडे, रीता जाधव, विजय राठोड, अविनाश राठोड आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.