Pune Crime News : आकर्षक योजनेतून बंगला देण्याच्या आमिषाने 26 लाखांची फसवणूक, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बांधकाम प्रकल्पात आकर्षक योजनेचे आमिष दाखवून तरुणाकडून 26 लाख रूपये घेउन बंगलो देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोघाजणांना हडपसर पोलिसांनी अटक केले आहे. ऑक्टोबर 2018 ते मार्च 2021 कालावधीत हा प्रकार घडला आहे.

वैभव पांडुरंग तावरे (वय 29, रा. हडपसर) आणि अमित लक्ष्मण शेंडगे (वय 27, रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिरुद्ध घोडके (वय 21, रा. फुरसुंगी) यांनी तक्रार दिली आहे.

आरोपींनी ‘महालक्ष्मी डेव्हलपर्सद्वारे मांजरीतील गोकुळपार्कमध्ये 40 लाखांत बंगल्याचे मालक व्हा’ अशी जाहिरात केली होती. त्यानुसार आरोपींनी अनिरुद्ध यांच्या विश्वास संपादित करून त्यांना कर्ज काढण्यास प्रवृत्त केले. अनिरुद्ध यांच्याकडून महालक्ष्मी डेव्हलपर्सच्या खात्यात 26 लाख रूपये घेउन बंगलो न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. डी. पाटील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.