Pune Corona Update : रुग्णवाढ कायम, आज 1925 नव्या रुग्णांची नोंद; 677 जणांना डिस्चार्ज
एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, मंगळवारी नव्याने 1925 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 21 हजार 210 इतकी झाली आहे. तर कोरोना उपचारातून बरे झालेल्या शहरातील 677 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 044 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 12 लाख 63 हजार 696 इतकी झाली आहे. शहरात सध्या 13225 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
कोरोना उपचारातून बरे झालेल्या 677 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 03 हजार 016 झाली आहे.
पुणे महापालिका हद्दीत नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 4 हजार 969 इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 13 हजार225 रुग्णांपैकी 394 रुग्ण गंभीर तर 798 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.