Bhosari Crime News : वाहनांची तोडफोड करत जबरी चोरी; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तिघांनी मिळून तीन वाहनांची तोडफोड करत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच एका व्यक्तीच्या खिशातून एक हजार 100 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री संत तुकाराम नगर,भोसरी येथे घडली.

आकाश गोविंद शर्मा (वय 22), दशरथ देवकाते (वय 21), राम देवकाते (वय 18, तिघे रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रामदास मनोहर नरवडे (वय 50, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची अल्टो कार (एम एच 14 / सी के 8168), प्रशांत व्यंकटराव बिरादार यांची कार (एम एच 14 / एच यु 4080) आणि राजेंद्र ज्ञानदेव पाचारणे यांची कार (एम एच 14 / एफ आर 9990) या वाहनांची सिमेंटच्या गट्टूने तोडफोड केली.

यामध्ये तिन्ही वाहनांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर प्रशांत बिरादार यांच्या खिशातून एक हजार 100 रुपये जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.