Chakan Crime News : कार अडवून दाम्पत्यास मारहाण, कारची तोडफोड

एमपीसी न्यूज – कार बाजूला घेण्याच्या कारणावरून तिघांनी मिळून कारला दुचाकी आडवी लावून कार अडवली. त्यानंतर दाम्पत्यास बेदम मारहाण केली आणि कारची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 16) रात्री खेड तालुक्यातील कुरकुंडी गावाजवळ घडली.

जितेंद्र विलास बालघरे (वय 30, रा. राजगुरूनगर, ता. खेड), सारिका जितेंद्र बालघरे (वय 27) अशी मारहाण झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत जितेंद्र यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदेश चिंधू पडवळ, महेश वाघमारे, धनु वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या इनोव्हा कार (एम एच 43 / एक्स 1799) मधून घराकडे जात होते. कुरकुंडी गावाजवळ फिर्यादी यांच्या मामाच्या घराजवळ राहणाऱ्या तिन्ही आरोपी यांनी गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून दुचाकी कारला आडवी लावली. कार अडवून फिर्यादी यांचा रस्ता रोखला.

त्यानंतर आरोपींनी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. तसेच त्यांच्या इनोव्हा कारची तोडफोड करून नुकसान केले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.