Maval News : वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी द्यावी – पूजा वहिले

एमपीसी न्यूज – शासनाच्या नवीन नियमानुसार वडगाव शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने व इतर आस्थापना सुद्धा सकाळी 7 ते सायं 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी मिळावी, अशा आशयाची मागणी नगरसेविका पूजा विशाल वहिले यांनी वडगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना नगरसेविका पूजा वहिले यांच्या समवेत नगरसेवक, गटनेते राजेंद्र कुडे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे या ठिकाणी वडगाव नगरपंचायतच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना करण्यात येत असून शहरातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात घटत आहेत. शासनाकडून घालून दिलेल्या नियमांचे शहरातील व्यापारी काटेकोर पालन करत असल्याचे वहिले यांनी निवेदनात म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या संकटात अनेक छोटे मोठे व्यावसायिक याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. ती बळकट करण्यास मदत करावी व शहरातील सर्व आस्थापना 4 वाजे पर्यत उघडण्यास परवानगी देण्याची विनंतीही निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.