Chakan Crime News: पेट्रोल पंपाची परवानगी मिळवून देण्याच्या बहाण्याने 42 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पेट्रोल पंपाची परवानगी मिळवून देण्याच्या बहाण्याने बँक खात्यावर आणि रोख स्वरूपात तब्बल 42 लाख 42 हजार रुपये घेतले. लाखो रुपये घेऊन पेट्रोल पंपाची परवानगी मिळवून न देता फसवणूक केल्याचा प्रकार खेड तालुक्यातील महाळुंगे गावात उघडकीस आला आहे.

नंदलाल काशिनाथ यादव, अच्छेलाल काशिनाथ यादव (दोघे रा. सेकटोटी, ता. नूरपूर, जि. बलिया, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत संदेश आनंद म्हात्रे (वय 40, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी बुधवारी (दि. 8) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 20 एप्रिल 2017 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीत महाळुंगे येथे फिर्यादी यांच्या घरी घडला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना एच पी पेट्रोल पंपाची परवानगी मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून फिर्यादी यांच्याकडून दोन बँक खात्यावर 35 लाख 96 हजार रुपये घेतले. तसेच सहा लाख 46 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. आरोपींनी फिर्यादींकडून एकूण 42 लाख 42 हजार रुपये घेतले. एवढे पैसे घेऊन पेट्रोल पंपाची परवानगी मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.