Maharashtra Corona Update : दिलासादायक! ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली
एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) दिवसभरात 6,107 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 16,035 कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, महाराष्ट्रातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या एक लाखाच्या खाली आली आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 78 लाख 16 हजार 243 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 73 हजार 069 जण बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.89 टक्के एवढा आहे.
राज्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्याच्या घडीला राज्यात 96 हजार 69 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 6,107
*⃣Recoveries – 16,035
*⃣Deaths – 57
*⃣Active Cases – 96,069
*⃣Total Cases till date – 78,16,243
*⃣Total Recoveries till date – 75,73,069
*⃣Total Deaths till date – 1,43,155
*⃣Tests till date – 7,57,68,634(1/5)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) February 8, 2022
राज्यात आज 57 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 43 हजार 155 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.83 टक्के एवढा आहे.
राज्यात आजवर 7 कोटी 57 लाख 68 हजार 634 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2,412 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 6,39,490 जण होम क्वारंटाईन आहेत.