Talegaon Dabhade : गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच माझी जडणघडण झाली – रो. दीपक फल्ले
एमपीसी न्यूज – गुरूंच्या मार्गदर्शनामुळेच माझी जडणघडण झाली, असे भावोद्गार रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष रोटरियन दीपक फल्ले यांनी काढले.शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षकांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास रो दिलीप पारेख,रो संजय मेहता, रो किरण ओसवाल, रो राकेश ओसवाल हे उपस्थित होते.
फल्ले म्हणाले, शिक्षकांनी आम्हाला आमच्या चुका दाखवल्या व त्या चुकांमधून शिकून आम्ही आज खूप मोठी झेप घेऊ शकलो याचे सर्व श्रेय हे आमच्या शिक्षकांना जाते.ते पुढे म्हणाले, शिक्षक दिनाचे औचित्य साधून आज बाल विकास विद्यालयमधील मेरी लाला मिस,प्राध्यापक नूतन कांबळे व लीना परगी या शिक्षकांचा रोटरी सिटीतर्फे सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी रो डॉ. रघुनाथ कश्यप, लाला मिस, बालविकासच्या प्राध्यापक नूतन कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो चेतन पटवा यांनी केले तर आभार प्रदर्शन रो रेश्मा फडतरे यांनी केले.