Pimpri News : साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित करा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.त्यामुळे महापालिका प्रशासनाने डेंगी आणि साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित कराव्यात, अशी मागणी युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी केली.तसेच जिजाऊ मोहल्ला क्लिनिक वार्ड स्तरावर वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह  यांना निवेदन देण्यात आले आहे.त्यात म्हटले आहे की,  जिथे तक्रार केली जाते तेवढ्याच भागात महापालिकेच्यावतीने फवारणी केली जाते. खर तर पावसाळ्यात प्रत्येक प्रभागात सरसकट धुराची गाडी, व फवारणी केले जाणे आवश्यक असून या बाबतीत महापालिका प्रशासन उदासीन दिसून येत आहे.पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांमूळे संपूर्ण शहरात जुलैपासून नागरिक सातत्याने आजारी पडत आहेत.

डेंगी,मलेरिया,सर्दी,खोकला,अंगदुखीला अटकाव करण्यासाठी  महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या
वतीने कोणत्याही प्रकारची  साथरोग प्रतिबंधक  मोहीम हाती घेतलेली नाही.अशी मोहिम राबवून डास उत्पत्ती ठिकाणे,पाणथळ जागा यांचे सर्वेक्षण वार्ड स्तरावर केले नाही.त्यामुळे शहरातील मनपाचे दवाखाने, खाजगी दवाखाने येथे रुग्णाची गर्दी वाढत आहे.शहरातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रभागात औषध फवारणी करावी.कोरोना काळातील प्रतिबंधात्मक उपाययोजनचे प्रभावी मॉडेल वापरावे,ओपीडीमध्ये तातडीने अतिरिक्त आरोग्य कर्मचारी नेमून जिजाऊ मोहल्ला कमिटी संकल्पना त्वरित राबवावी, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे विकेंद्रीकरण होऊन नागरिकांना त्यांच्या निवासी क्षेत्रात मोफत उपचार मिळतील.औषधे आणि इंजेक्शन्स साठी विशेष आर्थिक तरतूद करून तुटवडा निर्माण होणार नाही याचे व्यवस्थापन करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश निकाळजे, उपाध्यक्ष लवकुश यादव, सरचिटणीस दीपक गुप्ता, सचिव ओम शिरसागर सचिन कोडग व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.