Har Har Mahadev Movie : चित्रपट टिव्हीवर दाखविल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल- संभाजी राजे

एमपीसी न्यूज : हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट हर हर महादेव (Har Har Mahadev Marathi Movie) हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. संभाजीराजे यांनी याबाबत झी स्टुडिओला एक पत्र लिहिले असून या पत्रातून त्यांनी इशारा दिला आहे.

“हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये,” याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे.

Voter Registration Camp : हिंजवडी परिसरात 5 डिसेंबर रोजी होणार मतदार नोंदणीचे विशेष शिबीर

या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, इशारा संभाजीराजे यांनी दिला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरून संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेने आक्रमक पवित्रा घेतलाय.संभाजीराजे यांनी यापूर्वीच हर हर महादेव चित्रपटावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु, येत्या 18 डिसेंबर रोजी हा चित्रपट झी मराठी या वाहिनीवरून प्रदर्शित होणार आहे. संभाजीराजे यांनी घेतेलेल्या ह्या भूमिकेनंतर आणि त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर झी स्टुडिओ ही वाहिनी काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.