Padma Puraskar : यंदा महाराष्ट्रातून 13 दिग्गज पद्म पुरस्काराचे मानकरी; परशुराम खुणे, रमेश पतंगे यांनाही स्थान

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताकदिनाच्या दिनानिमित्त दिल्या (Padma Puraskar) जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 9 दिग्गज व्यक्तींना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. यामध्ये झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे, समाजसेवक भिकु इदाते, मरणोत्तर राकेश झुणझुणवाला तर ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे आणि रविना टंडन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  

महाराष्ट्रातील पुरस्कार –

झाकीर हुसेन
कुमार मंगलम बिर्ला
दीपक धर
सुमन कल्याणपूर
भिकू रामजी इदाते
राकेश राधेश्याम
झुनझुनवाला (मरणोत्तर)
परशुराम कोमाजी खुणे
प्रभाकर भानुदास मांडे
गजानन जगन्नाथ माने
रमेश पतंगे
रवीना रवी टंडन
कुमी नरिमन वाडिया

इतर यादी – PadmaAwardees2023_1674663366

केंद्र सरकारने एक पद्मविभूषण आणि 25 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. झाडीपट्टीतील रंगभूमीचे डॉ. परशुराम खुणे हे ज्येष्ठ विनोदी नट आहेत. कुरखेडा तालुक्याच्या गुरनुली गावातील डॉ. परशुराम खुणे गेल्या ४० वर्षांपासून झाडीपट्टीच्या रंगभूमीवर रसिकप्रिय विनोदी नट आहेत.

Rajesh Deshmukh : पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवार्ड’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.