Republic Day : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रजासत्ताकदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

ध्वजारोहण समारंभापूर्वी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या  (Republic Day) सोहळ्यासाठी आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आणि  महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.