Padma Awards 2024 : देशातील पद्म पुरस्काराची नावे जाहीर; व्यंकय्या नायडूंना पद्मविभूषण, राम नाईक यांना पद्मभूषण; वाचा संपूर्ण यादी

एमपीसी न्यूज : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी रात्री (Padma Awards 2024) पद्म पुरस्कार 2024 ची घोषणा करण्यात आली. याअंतर्गत पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची नावे जाहीर करण्यात आली. यापूर्वी 23 जानेवारी रोजी मोदी सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली होती. माजी उपराष्ट्रपती आणि भाजपा नेते व्यंकय्या नायडू, अभिनेत्री वैजंयतीमाला बाली, अभिनेता के. चिरंजिवी आदींना पद्मविभूषण तर  माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, संगीतकार प्यारेलाल शर्मा, अभिनेते मिथुन चक्रवर्ती आदींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.यंदा महाराष्ट्रातून मल्लखांबपटू उदय देशपांडे यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.

सरकारने यावर्षी 34 व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. पद्म पुरस्काराने त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या, सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्थान असलेल्या आणि त्यांची जीवनकथा लोकांना सकारात्मक संदेश देऊ शकणार्‍या गायक नायकांना सन्मानित करण्यात येईल.

 

Chinchwad : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठपनेनिमित्त उजळली होती चिंचवडमधील मंदिरे

पद्म पुरस्कार मिळणार आहे त्यांची नावे -Padma Awards 2024

 

पद्मविभूषण (एकूण पाच)

  • वैजयंतीमाला बाली (कला / तमिळनाडू)
  • के. चिरंजीवी (कला / आंध्र प्रदेश)
  • एम. व्यंकय्या नायडू (राजकीय नेते / आंध्र प्रदेश)
  • बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) (समाजसेवा / बिहार)
  • पी. सुब्रह्मण्यम (कला / तमिळनाडू)

पद्मभूषण (एकूण 22 / महाराष्ट्रातील 6)

  • हॉर्मुसजी एन. कामा (साहित्य व पत्रकारिता / महाराष्ट्र)
  • अश्विन बालचंद मेहता (मेडिसीन / महाराष्ट्र)
  • राम नाईक (सार्वजनिक व्यवहार / महाराष्ट्र)
  • दत्तात्रय अंबादास राजदत्त (कला / महाराष्ट्र)
  • प्यारेलाल शर्मा (कला / महाराष्ट्र)
  • कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता / महाराष्ट्र)

पद्मश्री (एकूण 110 / महाराष्ट्रातील 6)

  • उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा / महाराष्ट्र)
  • मनोहर डोळे (औषध / महाराष्ट्र)
  • झाकीर आय काझी (साहित्य व शिक्षण / महाराष्ट्र)
  • चंद्रशेखर मेश्राम (औषध / महाराष्ट्र)
  • कल्पना मोरपारिया (व्यापार व उद्योग / महाराष्ट्र)
  • शंकर बाबा पापळकर (समाज सेवा / महाराष्ट्र)

पद्मश्री पुरस्कार प्राप्त अन्य मान्यवरांची नावे –

पार्वती बरुआ, वय 67, आसाम, सामाजिक कार्य (पशु कल्याण)
जागेश्वर यादव, 67 वर्षे, छत्तीसगड सोशल वर्क (आदिवासी)
चामी मुर्मू, 52 वर्षे, झारखंड सोशल वर्क (पर्यावरण)
गुरविंदर सिंग, 53 वर्षे, हरियाणा, सामाजिक कार्य
सत्य नारायण बलेरी, 50 वर्षे, केरळ (कृषी)
दुखू माझी, 78, पश्चिम बंगाल सामाजिक कार्य (पर्यावरण)
के चेल्लामल, 69 वर्षे, अंदमान निकोबार (कृषी)
संगथनकिमा, 63 वर्षे, मिझोराम, सामाजिक कार्य
हेमचंद्र माझी, 70 वर्षे, छत्तीसगड (आयुष)
यानुंग जामोह लेगो, 58 वर्षे, अरुणाचल प्रदेश (कृषी)
सोमन्ना, 66, कर्नाटक, सामाजिक कार्य (आदिवासी)
सर्वेश्वर बासुमेटरी, 61 वर्षे, आसाम, (कृषी)
प्रेमा धनराज, 72 कर्नाटक (वैद्यकीय)
उदय विश्वनाथ देशपांडे, 70 वर्षे, महाराष्ट्र (मल्लखांब प्रशिक्षक)
याज्की मोंक्शॉ इटालिया, 72 वर्षांचे, गुजरात (स्वदेशी-सिकल सेल)
शांती देवी पासवान आणि शिवन पासवान, मधुबनी बिहार (चित्रकला)
रतन कहार, 88, पश्चिम बंगाल, कला (लोकगीत गायन)
अशोक कुमार बिस्वास, 67 वर्षे, बिहार (चित्रकला)
बालकृष्ण सदनम पुथिया वीथिल, 79 वर्षे, केरळ, कला,
उमा माहेश्वरी डी, 63 वर्षे, आंध्र प्रदेश, कला
गोपीनाथ स्वेन, 105 वर्ष, ओरिसा, कला (भजन गायन)
स्मृती रेखा चखमा, ६३ वर्षे, त्रिपुरा कला (वस्त्र)
ओम प्रकाश शर्मा, 85 वर्षे, मध्य प्रदेश कला (थिएटर-लोक)
नारायण ईपी, 67 वर्षे, केरळ कला (नृत्य)
भागवत प्रधान, 85 वर्षे, ओरिसा, कला (नृत्य)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.