Wakad News : PMRDA च्या भूखंडावरील अनधिकृत झोपड्यांबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या वाकड येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भूखंडावर वसलेल्या बेकायदेशीर झोपडीधारकांवर कारवाईची तक्रार थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Wakad News) या झोपड्यांमुळे बाजूच्या गृहनिर्माण सोसायट्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तक्रार करुनही पीएमआरडीएकडून कारवाई झाली नाही. कारवाईसाठी गृह विभागाने पोलीस संरक्षण पुरविण्याची मागणी रिदम हाऊसिंग सोसायटीचे सचिव अभिजित गरड यांनी केली.

पीएमआरडीएच्या वाकड येथील सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 येथील मोकळ्या भुखंडावर बेकायदेशीरपणे झोपड्या वसल्या आहेत. स्वच्छता राखली जात नाही. कचरा नाल्यांमध्ये आणि उघड्या खड्यांमध्ये टाकला जात आहे. यामुळे सोसायटीमधील रहिवाशांच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यासाठी या झोपड्यांवर कारवाई करण्याबाबत रिदम हाऊसिंग सोसायटी आणि अनमोल रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिका-यांनी पीएमआरडीएकडे तक्रार केली. परंतु, अद्याप त्यावर कारवाई झाली नाही.

Chinchwad Bye-Election : निवडणूक शहराच्या राजकारणाची दिशा बदलणारी – राहुल कलाटे  

त्यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोसायटी धारकांशी संवाद साधण्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी रिदम सोसायटीचे सचिव अभिजित गरड यांनी (Wakad News) वाकड सर्व्हे क्रमांक 210, 208, 209 च्या मोकळ्या भूखंडावरील अनाधिकृत झोपड्यांकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले.

झोपड्यांवरील कारवाईसाठी केलेल्या पाठपुराव्याची सर्व निवेदने व  कागदपत्रे दिली. गृह खात्याने कारवाईला आवश्यक असणारे पोलीस संरक्षण द्यावे. या अनधिकृत झोपड्यांवर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली. फडणवीस यांच्याकडे या समस्याचे लक्ष वेधले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.