Chinchwad News : महिलेचे दिड लाखांचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज – पादाचारी महिलेच्या गळ्यातील दीड लाखाची सोनसाखळी हिसकावली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी बारा वाजताच्या सुमारास रिव्हरव्ह्यू चौक,(Chinchwad News) चिंचवड येथे घडली. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Wakad News : PMRDA च्या भुखंडावरील अनधिकृत झोपड्यांबाबत थेट उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Chinchwad News) फिर्यादी महिला रिव्हरव्ह्यू चौकातून पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची मंगळपोत चोरून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.