Pimpri-Chinchwad : मिसींग मॅन जाधव यांचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ट्विटरद्वारे कौतुक

एमपीसी न्यूज – मिसींग मॅन नाव ऐकूनच काही तरी वेगळ आहे हे जाणवल असलेच.. हे नाव देण्यामागे कारणही तसेच आहे. मिसींग मॅन पोलीस शिपाई सचिन जाधव यांच्या कामगिरीवरून  त्यांचे हे आगळे-वेगळे नाव पडले आहे. (Pimpri-Chinchwad) कारण सचिन जाधव यांनी एका वर्षात 464 हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप सुपूर्द केले आहे. त्यांच्या याच कामगिरीचे ट्विटर द्वारे मिसींग मॅन सचिन जाधव असे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कौतुक केले आहे. या ट्वीवटला नागरिकांनीही रिप्लाय देत जाधव यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

जाधव हे भोसरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई या पदावर काम करतात. त्यांचे बातमीदरांचे नेटवर्क व विशिष्ठ गोष्टींचा अभ्यास य़ामुळे त्यांनी वर्षभरात तब्बल 464 म्हणजे मंडळी दिवसाला एक जण तरी शोधून दिला असे म्हटले तरी हरकत नाही. त्यांच्या या कामामुळेच त्यांना पोलीस वर्तुळात मिसींग मॅन  नावाने ओळखले जाते.

Chinchwad News : महिलेचे दिड लाखांचे दागिने हिसकावले

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अकडेवारीनुसार मागील केवळ 50 दिवसात 348 जण बेपत्ता झाले आहेत.तर 2022 या वर्षात 2 हजार 671 जण बेपत्ता झाले होते. त्यातील 464 जण जाधव यांनी शोधले आहेत. दरवर्षी  पोलिसांकडून बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. यात तरुण किंवा अल्पवयीन मुलांचा समावेश जास्त असतो. कारण तरुण वयात पटकन येणारा राग, आई-वडील काही बोलले किंवा कसला तणाव असला तरी मुल घर सोडण्याचा विचार करतात. तसेच प्रेमविवाहासाठीही अनेक जण पळून जाणे हाच एक मार्ग निवडतात.

अशा वेळी तांत्रिक तपास, कुटुंबीयांनी दिलेली य़ोग्य माहिती कामी येते असे जाधव यांचा अनुभव सांगतो. मात्र कोणत्याही अडचणीत पळून जाणे किंवा घर सोडणे हा उपाय नसतो.(Pimpri-Chinchwad) त्यामुळे काही असले तरी चर्चेतून मार्ग काढावा, कुटुंबीयांनीही त्यांच्या मुलांना समजून घ्यावे कारण घर सोडून जाणे सोपे असते पण घरी परत येणे तेवढेच कठीण असते, असा सल्लाही पोलीस दल नागरिकांना देते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.