HSC Result : यंदा पुण्याने पटकवला दुसरा क्रमांक; पुणे विभागाचा निकाल 93.34 टक्के

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (HSC Result) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे विभागीय मंडळाचा निकाल 93.34 टक्के लागला आहे. पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.

पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण या नऊ विभागांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कोकण विभागाने (96.01 टक्के) बाजी मारली आहे. पुणे विभाग (93.34 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पुणे विभागात दोन लाख 40 हजार 692 पैकी एक लाख 32 हजार 800 मुले तर (HSC Result) एक लाख 7 हजार 892 मुलींनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख 21 हजार 427 मुले तर एक लाख तीन हजार 238 मुली असे एकूण दोन लाख 24 हजार 665 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागातील 16 हजार 27 विद्यार्थी नापास झाले आहेत. पुणे विभागात मुलांचा निकाल 91.43 टक्के तर मुलींचा निकाल 95.68 टक्के लागला आहे.

शाखा निहाय पुणे विभागाचा निकाल –

शाखा नोंदणी      परीक्षा दिलेले उत्तीर्ण झालेले टक्केवारी
विज्ञान 120106 119677 115943 96.87
कला 55210 54163 46661 86.14
वाणिज्य 59959                   55296                 92.81 59575 55296 92.81
व्यवसाय अभ्यासक्रम 6712 6532 6072 92.95
आयटीआय 747 745 693 93.02

 

श्रेणी निहाय पुणे विभागाचा निकाल – 

श्रेणी विद्यार्थी संख्या
75 टक्के आणि पुढे 22468
60 टक्के आणि पुढे 72693
45 टक्के आणि पुढे 103728
35 टक्के आणि पुढे 25776

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.