Pune : धक्कादायक, आरोग्य निरीक्षकांकडून सफाई कामगार महिलेचा विनयभंग
एमपीसी न्यूज – सफाई कामगार महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ( Pune ) पुणे महापालिकेच्या एका आरोग्य निरीक्षकावर, तर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ठेकेदारासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी बिबवेवाडीतील एका 40 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महापालिकेत कंत्राटी सफाई कामगार आहेत.
Bhosari : चक्रपाणी वसाहतीतील रस्त्याच्या कामाला ‘गती’
माने याने त्यांचा विनयभंग केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याने दरमहा पगारातील पाचशे रुपये देण्याची मागणी केली. रजेवरून परतल्यानंतर 10 एप्रिल रोजी कामावर हजर होण्याबाबत पत्र घेण्यासाठी ही महिला ठेकेदार सुळ याच्याकडे गेली.
त्यावेळी त्याने महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. याबाबत तक्रार केल्यानंतर तो अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला ( Pune ) आहे.