Maval : टाकवे बुद्रुक येथील इंग्लिश स्कूलमध्ये भोंडल्याचा उत्सव साजरा
एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील( Maval ) राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये भोंडला साजरा करण्यात आला. संपूर्ण भोंडल्यामध्ये आणि दांडियामध्ये विद्यार्थी तल्लीन होऊन गेले.
विद्यार्थ्यांसोबत उप मुख्याध्यापिका प्रियांका कुडे, शिक्षक कांचन जाचक, पूजा कालेकर, नेहा असवले, ऐश्वर्या मालपोटे,रुपाली जाधव, स्नेहा जगताप, प्रिती जोगदेव, सपना भालेराव, अमिता जोशी, वनिता गायकवाड आणि अविनाश जाधव यांनी ठेका धरला.
भोंडला व दांडियाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत आपापल्या वर्गाची सजावट केली. तसेच वह्या पुस्तकांचे ( Maval ) पूजन केले.