PCMC : निवृत्ती वेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणीसाठी ‘पेन्शनर ॲप’

एमपीसी न्यूज – निवृत्ती वेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणी (PCMC) आणि त्यांचे निवृत्तीवेतन त्वरीत वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका लवकरच ‘पेन्शनर ॲप’ लॉन्च करणार आहे. या ॲपचे प्रात्याक्षिक महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात सादर करण्यात आले.

ॲपच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, पेन्शनर ॲप ही खासकरून महापालिका निवृत्ती वेतनधारकांसाठी बनवली गेलेली एक अभिनव डिजिटल सेवा आहे.

हे ॲप निवृत्ती वेतन धारकांना त्यांचे अस्तित्व सत्यापित करण्यासाठी तसेच फेस रिकॉगनिशन आणि बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या पेन्शनचा दावा करण्यासाठी एक सोयीस्कर आणि कार्यक्षम मार्ग उपलब्ध करून देते.

Pune : विनोदी अभिनेता म्हणून बसलेल्या शिक्क्याचा 100% अभिमानच – प्रशांत दामले

तसेच महापालिकेशी संबंधित 5 हजार 728 निवृत्ती वेतन धारकांना या डिजिटल सेवेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. (PCMC)

पेन्शनर ॲपचा फायदा घेऊन ते त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने सबमिट करू शकतात, ज्यामुळे सरकारी कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देण्याची गरज नाही, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.

महापालिका पेन्शनर ॲप सुविधेचा लाभ घेण्यासाठी पेन्शनधारक के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महापालिकेला भेट देऊ शकतात.

पेन्शनचा दावा करणारी व्यक्ती खरोखरच ती स्वत:च आहे का याची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे, असे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रवीण जैन म्हणाले.

पेन्शनर ॲपचे प्राथमिक उद्दिष्ट निवृत्तीवेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणी आणि त्यांचे निवृत्तीवेतन त्वरित वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करणे आहे.

जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या पारंपारिक पद्धतीला डिजिटल सोल्यूशनसह बदलल्याने कागदपत्रांची संख्या कमी होणार असून यामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या वेळेची बचत होणार आहे तसेच त्यांची होणारी गैरसोयही कमी होणार आहे.

पेन्शनर ॲपची वैशिष्ट्ये!

  • ओटीपी द्वारे पेन्शनर ॲपमध्ये करता येणार लॉगिन
  • गुगल लँजिट्युड आणि लॅटीट्युडद्वारे निवृत्ती वेतनधारकांच्या स्थानाची मिळणार माहिती
  • फेस रिकॉगनिशन तसेच बायोमेट्रिक ऑथेंटीकेशन तंत्रज्ञानाचा वापर
  • प्रमाणित करण्यासाठी प्रमाणपत्रावर क्युआर कोडचा वापर
  • लॉगिनमधून जीवन प्रमाणपत्र तसेच वार्षिक विवरणपत्र करता येणार डाऊनलोड
  • निवृत्ती वेतनधारकांना एसएमएसद्वारे मिळणार माहिती

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.