Manchar : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उप जिल्हा रुग्णालय मंचर येथे दि.24 ऑक्टोबर रोजी अत्याधुनिक सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन (Manchar) करण्यात आले.

यावेळी तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य डी.के.वळसे पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृष्णा डायग्नोस्टिक केंद्राचे डॉ. परीमल सावंत, डॉ. संजयकुमार भवारी आदी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना लाभ व्हावा यासाठी या तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. येथे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच बाह्य रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच दुर्धर आजाराची पूर्व तपासणी केली जाणार आहे. गरजू (Manchar) नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

PCMC : निवृत्ती वेतनधारकांच्या अस्तित्वाची पडताळणीसाठी ‘पेन्शनर ॲप’

सार्वजनिक आरोग्य विभाग व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने सार्वजनिक खासगी तत्वावर या सीटी स्कॅन तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

सी.टी.स्कॅन केंद्राचा या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे, असेही वळसे-पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. जाधव यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.