Nigdi : निगडीत गुरुवारी ‘ईशान्य भारताची शोधयात्रा’यावर व्याख्यान

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्गमित्र विभागामार्फत (Nigdi) श्रीकांत मापारी यांचे उद्या (गुरुवारी) ‘ईशान्य भारताची शोधयात्रा’ यावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

कॅप्टन जी. एस. कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, निगडी-प्राधिकरण येथे गुरुवारी सायंकाळी सात वाजता हे व्याख्यान होणार आहे.

Pimpri : मराठा समाजाचे पिंपरीत साखळी उपोषण

भटकंती करतांना बहुधा आपलं उद्दिष्ट हे प्रेक्षणीय स्थळे बघणे हेच( Nigdi )असतं. पण याचबरोबर काही सामाजिक जाणीव म्हणून भटकंती केली तर? ईशान्य भारत हा अजूनही आपल्यासाठी रहस्यमय किंवा तुटपुंज्या माहितीवर आधारित आहे.

अश्या ईशान्य भारतातील प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक समस्या, त्यासाठी चालणारी अनेक कामं, अवघड परिस्थितीत पाय रोवून काम करणारे कार्यकर्ते अशा विविध विषयांवर आधारित आगळ्या वेगळ्या विषयावरील व्याख्यान ऐकायला नक्की या असे आवाहन मंडळातर्फे भास्कर रिकामे यांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.