Pune : साधनांची कमतरता नाही, गरज संस्कारक्षम पिढी घडविण्याची – चंद्रकांत पाटील
एमपीसी न्यूज – समाजाची गरज ओळखून उपक्रम राबविण्याची ( Pune ) गरज असून जेथे जे पाहिजे तेच देता आले पाहिजे आणि तेच समाजकार्य क्रिएटिव्ह फाउंडेशन, ग्लोबल ग्रुप आणि सतीश गायकवाड मित्र परिवार करत आहे, असे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सध्या साधनांची कमतरता नसून संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज असल्याचे सांगताना हे काम शिक्षकांच्या हातूनच घडू शकते आणि तेच भावी काळातील चांगले नागरिक घडवू शकतात, त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास मी तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि सतीश गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने कर्वेनगर येथील अभिजात एजयुकेशन सोसायटी च्या ग. रा. पालकर शाळेस शालेय साहित्य व क्रीडा साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, सतीश गायकवाड, माजी नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे राहुल बग्गा, माजी नगरसेवक जयंत भावे, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, शहर चिटणीस कुलदीप सावळेकर,प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे,श्रीमती पालकर,
Pune : समाजापुढील आजची आव्हाने वाढणे चिंताजनक परिसंवादातील सूर