Maharashtra : शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, विदर्भ वगळता 15 जून पासून शाळा होणार सुरु  

एमपीसी न्यूज – शिक्षण विभागाने शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर ( Maharashtra) केली आहे. विदर्भ वगळता या शाळा पुन्हा 15 जून पासून सुरु होणार आहेत. तर विदर्भातील शाळा 1 जुलैपासून सुरू होणार आहेत.याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी या संदर्भातील संयुक्त परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

 

Pune : पुण्यात एप्रिल महिन्यात मागील पाच वर्षातील सर्वाधीक तापमान, गुरुवारी काही भागात तापमान 43 अंशावर

राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता, सुसंगती राहण्यासाठी उन्हाळी सुटी, शैक्षणिक वर्ष 2024- 2025 सुरू करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील शाळांना 2 मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने उचित निर्णय घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 रोजी रविवार येत असल्याने 1 जुलैपासून सुरू कराव्यात असे नमूद करण्यात आले ( Maharashtra) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.