Pune : राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला 43 हजारांचा दारूसाठा

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकाने म्हाळुंगे (Pune)गावच्या हद्दीत 43 हजारांचा दारूसाठा जप्त केला. छापा मारून केलेल्या कारवाईमध्ये विभागाने एका कारसह दोन लाख 68 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला म्हाळुंगे गावच्या हद्दीत दारू वाहतूक होत (Pune)असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाने सापळा लाऊन छापा मारला. या छाप्यात अंदाजे 2 लाख 25 हजार रुपयांच्या सॅन्ट्रो कारमध्ये 35 लीटर क्षमतेच्या 12 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 43 हजार 200 रुपये किंमतीची दारु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध सूरू असून आरोपी विरूद्ध मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (ए)(ई) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निरीक्षक सचिन श्रीवास्तव पुढील तपास करीत आहेत.

Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा ‘मोका पॅटर्न’; 63 गुन्हेगारी टोळ्या तुरुंगात

ही कारवाई डी विभागाचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक विजय सूर्यवंशी, शीतल देशमुख, सागर ध्रुवे जवान संजय गोरे, राजू पोटे, शुभम मुंढे व वाहन चालक राऊत यांच्या पथकाने केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.