Pimpri: कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेचा रविवारी स्नेहमेळावा
एमपीसी न्यूज – कोकण खेड तालुका अठरागांव रहिवासी विकास संस्थेच्या अठराव्या स्नेहमेळाव्याचे येत्या रविवारी (दि.12) आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवडगांव येथील चैतन्य सभागृहात सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळात हा स्नेहमेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे हे उपस्थित रहाणार आहेत. महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी नगरसेवक सद्गुरू कदम, माजी नगरसेविका निर्मला कदम, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका विजया सुतार, माजी नगरसेविका अश्विनी जाधव आदी उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, विशेष कार्याबद्दल मान्यवरांचा सत्कार व महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या सुरूवातीला जन जागृतीचा मेळ व लहान मुलांच्या नृत्याच्या कार्यक्रम होणार आहे. जास्तीत-जास्त नागरिकांना या स्नेहमळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.