Pimpri: शहर शिवसेनेतर्फे जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल गजानन चिंचवडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या मावळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानिमित्त गजानन चिंचवडे यांचा सत्कार करण्यात आला.

आकुर्डीतील शिनसेना कार्यालयात झालेल्या सत्कार समारंभावेळी शहरप्रमुख योगेश बाबर, शहर संघटिका सुलभा उबाळे, विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, नगरसेवक प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका वैशाली मराठे, प्रतीक्षा घुले, उपसंघटिका अनिता तुतारे, मंगला भोकरे, रोमी संधू, संतोष सौंदनकर, दीपक ढोरे, भाविक देशमुख, नवनाथ तरस, सोमनाथ गुजर, सुनील ढोरे, अमोल निकम, सचिन चिंचवडे, श्रीमंत गिरी, रामचंद्र जमखंडी, पार्थ गुरव, संतोष तरस, विजय साने, नाना सोनार, विशाल गावडे, अनिकेत कल्याणकर, सुरेश राक्षे, बाळासाहेब वाल्हेकर, कार्यालय प्रमुख बशीर सुतार, सचिव -ज्ञानेश्वर शिंदे उपस्थित होते.

गजानन चिंचवडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर व मावळात सर्वांना बरोबर आणि विश्वासात घेऊन काम करणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विधायक उपक्रम, सत्ताधारी व प्रशासनाच्या चुकीच्या कामाबद्दल आवाज उठविण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.