Pune : शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेची मर्यादा आता दोन लाख

एमपीसी न्यूज- शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत पॅनलवरील खासगी रुग्णालयांत अंतर्गत विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी एक लाखाची मर्यादा रक्कम आता दोन लाखांपर्यंत वाढविण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत सभासदत्व मिळवण्यासाठी वय वर्ष 60 पेक्षा जास्त असलेल्या निराधार ज्येष्ठांना व अनाथ मुलांना उत्पन्न दाखल्याची अट वगळण्यासाठी मान्यता देखील स्थायी समितीच्या मान्यता दिली आहे.

पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांच्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी शहरी गरीब वैद्यकीय योजनांतर्गत एका वर्षासाठी एक लाख रुपये कमाल मर्यादा पर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेअंतर्गत आर्थिक लाभाची कमाल मर्यादा, योजनेअंतर्गत अनाथ मुलांचा समावेश व योजनेचे सभासदत्व मिळवण्यासाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये बदल करण्यात आला आहे.

शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेतील एक लाख रुपयांची मर्यादा दोन लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयामुळे शहरी गरीब योजनेचा लाभ घेताना उत्पन्नाचा दाखला सादर करण्यासाठी अडचणीचे ठरत असल्या कारणाने 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या निराधार ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्न दाखल्याची अट वगळण्यात यावी, पुणे महापालिकेच्या हद्दीतील अनाथ मुलांना शहरी गरीब योजने अंतर्गत समाविष्ट करून सभासदत्वासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट वगळण्यात यावी, आशा प्रकारचे बदल सुचविण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.