Pimpri:  सैनिकांच्या मुलांसाठी दिघी ते डेक्कन पीएमपीएलची स्कूल बस सुरू

नगरसेवक विकास डोळस यांच्या पाठपुराव्याला यश 

एमपीसी न्यूज – दिघीतील सैनिकांच्या मुलांसाठी पुणे महानगर परिवहन मंहामंडळाकडून (पीएमपीएमएल)दिघी ते डेक्कन स्कूल बस सेवा सुरु करण्यात आली आहे. नगरसेवक विकास डोळस यांच्या हस्ते आज (सोमवारी) बसचा शुभारंभ करण्यात आला.  

यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका निर्मला गायकवाड,  हिराबाई घुले, कुलदिप परांडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिघीमध्ये आजी-माजी सैनिकांची संख्या मोठी असून, अनेक जण खूप वर्षांपासून दिघीमध्येच स्थायिक झाले आहेत. सैनिकांची मुले डेक्कन येथील केंद्रीय विद्यालयात शिक्षणसाठी जातात. या मुलांना शाळेत जाण्यासाठी पीएमपीएलची बस सेवा नव्हती. दिघी ते डेक्कन अशी पीएमपीएलची बस सुरु करण्याची मागणी स्थायी समितीचे सदस्य विकास डोळस यांनी केली. त्याबाबत त्यांनी पीएमपीएमएल प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून आजपसासून बस सेवा सुरु झाली आहे. ही बस दिघी जकात नाका ते डेक्कन अशी धावणार आहे. सकाळी दोन बस धावणार आहेत.

याबाबत बोलताना नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ‘दिघी परिसरात अनेक आजी-माजी सैनिकांचे वास्तव्य आहे. त्यांच्या मुलांसाठी डेक्कनला शाळेत जाण्यासाठी बस सेवा सुरु करण्याची मागणी केली जात होती. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीएल बससेवा सुरू करण्याची मागणी होत होती. परंतु, पीएमपीएमल प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी विलंब होत होता. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते.

त्यासाठी स्थायी समिती सभेत आवाज उठविल्यानंतर पीएमपीएमलने बस सेवा सुरु केली आहे.  दिघी जकात नाका ते डेक्कन अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे. दिघीतील जकात नाक्यापासून सकाळी पावणे सात वाजता आणि साडेसात वाजता अशा दोन बस सुटणार आहेत. त्यानंतर दुपारी पावणेदोन वाजता विद्यार्थ्यांना घेण्यासाठी बस जाणार आहे. याचा विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी फायदा होणार आहे’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.