Pune : आमदार टिळेकरांनी धरले खंडणी प्रकरणातील फिर्यादीचे पाय ! (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज – पन्नास लाखांची खंडणी मागीतल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकरांवर काही दिवसांपूर्वी कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर टिळेकरांनी निवडणुकीच्या तोंडावर माझ्या विरोधात राजकीय षडयंत्र सुरू असून, माझ्यावर दाखल झालेला गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकीय संन्यास घेईल असं म्हटले होते. परंतु याप्रकरणात आता नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये आमदार टिळेकर खंडणी प्रकरणातील फिर्यादीचे पाय धरताना दिसत आहेत. त्यामुळे आता याप्रकरणाला नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.

आमदार योगेश टिळक यांच्या मतदार संघात फायबर ऑप्टीकलची कामे चालू असताना धमकी आणि त्रास देत, फोनवरून पन्नास लाखाची खंडणी मागितली असल्याच फिर्याद रवींद्र बराटे यांनी दिली आहे.

रवींद्र बराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार योगेश टिळेकर, भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश टिळेकर यांच्यावर कोंढवा बुद्रुक पोलीस स्टेशनमध्ये १२ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

https://www.youtube.com/watch?v=eg-mtNbvYEw&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.