Pune : पुण्यामध्ये रस्त्यात भरदिवसा गोळीबार, व हत्यारांनी वार

एक जण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पुण्यामध्ये शिंदे आळीत रस्त्यावर भरदिवसा गोळीबार व  हत्यारांनी वार करण्यात आले आहे. मंगेश धुमाळ (वय 32. शिंदे आळी शुक्रवार पेठ) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परीसरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी(दि.31) दुपारी साडेतीनच्या सुमारास शिंदे आळी उमरदंड चौके येथे पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दोन गटांमध्ये भांडण होऊन हा गोळीबार झाला आहे. यामध्ये कोयत्याचा वापर करून वार करण्यात आले आहेत.मंगेश धुमाळ पायाला गोळी लागली.आणि डोक्याला जखम झाली आहे.एकूण 5 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालात उपचार सुरु आहेत.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.परिसरात बघ्यांची गर्दी असल्याने, काही वेळासाठी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती.
याप्रकरणी पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.