Chakan : तीन लाख लंपास ; गुन्हा दाखल

चाकणच्या आंबेठाण चौकातील प्रकार

एमपीसी न्यूज – 3 लाखांची रोकड चारचाकी मोटारीची काच फोडून लांबविल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.7) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुणे नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड)  येथील आंबेठाण चौकात शुक्रवारी दुपारी बाराचे सुमारास हा प्रकार घडला होता.

संजय ज्ञानेश्वर देशमुख ( वय 46 , सध्या रा. स्वप्न नगरी, चाकण, मूळ रां. शिवे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मोटार चालक देशमुख यांनी  शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान चाकण येथील आंबेठाण चौकात राजगुरुनगर बँकेच्या समोर मोटार स्कॉर्पिओ जीप (क्र. एम एच 14 डी आर 7172) उभी केली होती. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी मोटारीची चालकाच्या बाजूकडील मागील भागाची काच फोडून मोटारीत ठेवलेली तीन लाख रुपयांची रोकड घेवून पोबारा केला.चाकण पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.