Maval : खारघरमध्ये ‘भारत माता की जय’च्या गर्जनेत महायुतीची प्रचार सभा

एमपीसी न्यूज- पनवेल मधील खारघर येथे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांची प्रचार सभा उत्साहात पार पडली. ‘भारत माता की जय’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणेत ही सभा उत्साहात पार पडली.

सभेसाठी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, महापौर डॉ. कविता चौटमल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते प्रमोद ठाकूर, सभापती अभिजित पाटील, जिल्हा प्रमुख कल्पना राऊत, तालुका अध्यक्ष अरुण भगत, दशरथ म्हेत्रे, प्रल्हाद केणी, भुपेंद्र पाटील, नगरसेवक रामजी बेहरा, भारती नवघरे, अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, अभिमन्यू पाटील, कुंदा मेंगडे, ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे, गीता चौधरी, दिलीप जाधव, साधना पवार, मीना घोगरी, लकवीर सिंग सैनी, संजय मुळीक, प्रभाकर बांगर, राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, कीर्ती नवघरे, चारुशीला घरत आदी उपस्थित होते.

महापौर डॉ. कविता चौटमल म्हणाल्या, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिला सक्षमीकरणात पुढाकार घेतला. त्याचबरोबर अन्य विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. उज्ज्वला योजना, उडाण योजना, मुद्रालोन, अटल पेंशन योजना, डिजिटल इंडिया यांसारख्या कित्येक योजना सांगता येतील. हे सक्षम सरकार पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी सर्वांनी जागरूकपणे महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यायला हवं.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “पनवेल तालुक्यामध्ये काम करत असताना आमदार, महापालिकेचे सर्व पदाधिकारी यांच्यासोबत मिळून काम केले. त्यांच्यासोबत मिळून स्थानिक प्रश्न सोडविले. अजूनही काही प्रश्नांचा पाठपुरावा सुरू आहे. विकासकामे करणा-या उमेदवाराला पवित्र मत देण्यासाठी मतदारांना प्रवृत्त करण्याचे आवाहनही बारणे यांनी केले”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.