Pimpri : मासुळकर कॉलनीत गीत रामायणास उत्स्फूर्त प्रतिसाद
एमपीसी न्यूज – हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) एप्रिलला मासुळकर कॉलनीमधील स्केटिंग ग्राऊंडवर, हिंद “श्री” प्रतिष्ठानने गीत रामायणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
युवा नेते कार्तिक लांडगे, मधुजी जोशी आदीच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाले. श्रोते या कार्यक्रमात रंगून गेले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चिपळूणकर, प्रसाद भाग्यवंत, दिपक कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, धनंजय जोशी आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.