Nigdi : निगडी लायन्स क्लबतर्फे मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमाला बेड साईड लॉकर्स भेट
एमपीसी न्यूज- निगडी लायन्स क्लबतर्फे चिंचवड येथील मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमाला बेड साईड लॉकर्स भेट देण्यात आले.
यावेळी निगडी लायन्स क्लबचे अध्यक्ष जनार्दन गावडे, ला. संजय निंबाळकर, सविता निंबाळकर, ला. अजित देशपांडे, एमजेएफ लायन्स अशोक येवले, उषा येवले, आर के मंत्री उपस्थित होते. या मदतीबद्दल मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमाच्या पधिकाऱ्यानी निगडी लायन्स क्लबचे आभार मानले.
प्रास्ताविक मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमाचे संजय कुलकर्णी यांनी केले. वृध्दाश्रमाची माहिती संस्थापक सुहास गोडसे यांनी दिली. आभार संस्कृती गोडसे यांनी मानले.