Bhosari Crime News : कार्यालयात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बालाजीनगर भोसरी (Bhosari Crime News) येथील एका कार्यालयात घुसून दोघांनी तोडफोड केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 7) रात्री साडेसात वाजता महेंद्र सरवदे यांच्या संपर्क कार्यालयात घडली.

अनिता लक्ष्मण सरवदे (वय 50, रा. बालाजीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप नलावडे (रा. बालाजीनगर, भोसरी) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Expose BJP : न्यायालयाच्या आदेशाने भाजपचे पितळ उघडे – संजय उदावंत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काहीही कारण नसताना फिर्यादी यांचा मुलगा महेंद्र यांच्या संपर्क कार्यालयात घुसून आरोपींनी तलवार व लोखंडी पाईपने तोडफोड केली. यात ऑफिस मधील संगणक आणि इतर साहित्याचे नुकसान झाले. तोडफोड केल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा मुलगा भैया नवगिरे याला हाताने मारहाण करून फिर्यादी यांचा मुलगा महेंद्र सरवदे याला मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस (Bhosari Crime News) तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.