Pimpri : गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चा माल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दोन महिलांनी त्यांच्या घरात साठवून ठेवला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 21) दुपारी भाटनगर, पिंपरी (Pimpri) येथे करण्यात आली.

Chinchwad : चेनचोरी, वाहन चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

पोलीस अंमलदार विकास रेड्डी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने दोन ड्रम मध्ये 250 लिटर गावठी दारू तयार करण्याचे 32 हजार 500 रुपयांचे कच्चे रसायन घरात ठेवले. दुसऱ्या महिलेने एका ड्रम मध्ये 200 लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी 25 हजार 500 रुपयांचे कच्चे रसायन साठवून ठेवले. याबाबत माहिती मिळाली असता पिंपरी पोलिसांनी महिलांच्या घरात कारवाई केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.