Chakan : खंडणी देण्यास विरोध केल्याने दुचाकीची तोडफोड

एमपीसी न्यूज –  खंडणी देण्यास विरोध केल्याने एकाने दुकानदार आणि त्याच्या नातेवाईकाला शिवीगाळ करून दुकान फोडून टाकण्याची धमकी दिली. दुकानदाराच्या दुचाकीची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना सोमवारी (वय 21) सकाळी नेहरू चौक, चाकण (Chakan) येथे घडली.

Pimpri : गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चा माल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल

प्रशांत बाबुराव दातार (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समीर रामसिंग सिंग (वय 32, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मोबाईल रिपेअरिंग चे दुकान आहे. त्या दुकानात येऊन आरोपीने फिर्यादी यांच्या नातेवाईकाला 200 रुपये खंडणी मागितली. फिर्यादी यांच्याशी फोनवर 200 रुपये खंडणी मागत खंडणी न दिल्यास दुकानाची तोडफोड करण्याची तसेच फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर दुकानासमोर पार्क केलेली फिर्यादी यांच्या दुचाकीची आरोपीने तोडफोड केली. मोठमोठ्याने आरडाओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.