Pimpri : उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – हात उसने दिलेले पैसे परत मागितले या रागातून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करत कोयत्याने मारहाण करत जखमी केले आहे. हि घटना बुधवारी (दि.14) दुपारी  पिंपरी (Pimpri) येथे घडला आहे.

Chinchwad : पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् शाळेत प्रवेशोत्सव आणि विद्याव्रत ग्रहण संस्कार समारंभ

याप्रकरणी आशिष सुधाकर शिंदे (वय 23 रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जमिर शेख व अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादीच्या तोंड ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी आरोपींनी हात ऊसने पैसे घेतले होते. ते माघारी मागितले असता आरोपींनी याचा राग येवून शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.

यावेळी फिर्यादीचा भाऊ आदर्श हा सोडविण्यासाठी आला असता अस्लम याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.