Talegaon dabhade: मित्रानेच गावी नेतो म्हणून बुलेट पळवली

एमपीसी न्यूज – मित्राने मित्राला विश्वासाने दिलेली बुलेट दुचाकी ही त्याची आहे, असे सर्वांना सांगून ती गावी नेली. बुलेट दुचाकी मित्राला परत न देता तिचा अपहार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangavi News : कंपनीत गुंतवणुकीच्या बहाण्याने पावणे नऊ लाखांची फसवणूक

साहिल शेख (वय 23, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) असे अपहार केलेल्या मित्राचे नाव आहे. याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकूर यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची बुलेट दुचाकी आरोपी मित्र साहिल याला विश्वासाने वापरण्यासाठी दिली. ती दुचाकी साहिल याने त्याच्या मूळ गावी मलकापूर येथे नेली. ती बुलेट स्वतःची आहे असे सांगून त्याने तिचा अपहार केला. बुलेट दुचाकी शकूर यांना परत न देता साहिल स्वतः वापरत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.