Bhosari : भक्ती-शक्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा; आश्वासनाची पूर्तता

एमपीसी न्यूज – अण्णाभाउ साठे कृती समितीने भक्ती-शक्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली. आमदार महेश लांडगे यांनी पुतळा उभारण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या भक्ती-शक्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी महेश लांडगे यांची निवड झाली. त्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीने 2014 मध्ये भक्ती-शक्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत उपोषण केले होते. त्यावेळी महेश लांडगे यांनी संबंधित पदाधिकार्‍यांना पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन संबंधित पदाधिकार्‍यांनी उपोषण मागे घेतले.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या जाहीरनाम्यात भक्ती शक्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे आश्वासन दिले. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महेश लांडगे यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. 2017 मध्ये या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे.

अण्णाभाऊ साठे विचारांचे अभ्यासक प्रशांत झोंबाडे म्हणाले, पिंपरी चिंचवड परिसरात तेही शहराच्या प्रवेशद्वारावर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा असणे ही अभिमानाची बाब आहे. आमदार महेश लांडगे यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. त्याची त्यांनी पूर्तता केली आहे. त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केल्यामुळे पुढील काळात देखील त्यांना संधी देण्याचा निर्णय समाजातील नागरिकांनी घेतला आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.