Red Zone : ‘रेडझोन’ हद्द निश्चितीसाठी महिनाभरात मोजणीची कार्यवाही

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत बैठक

एमपीसी न्यूज – संरक्षण विभागाच्या (Red Zone) देहू ॲम्युनेशन डेपो व दिघी मॅगझिन डेपो या भागातील ‘रेडझोन’ चे मार्किंग झालेले नाही. त्यामुळे रेड झोनची मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘रेडझोन’ बाबत बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सूर्यकांत मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, तहसीलदार अर्चना कदम, ‘पीएमआरडीए’ नगर रचना विभागाचे दशरथ पवार, पिंपरी-चिंचवड नगर भूमापन अधिकारी अमित ननावरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

संरक्षण विभागाने दिघी आणि देहू मॅगझिन डेपोच्या आवारातील ‘रेड झोन’ची हद्द निश्चित करावी. त्यासाठी सर्व्हेक्षण व मोजणी करुन नकाशा प्रसिद्ध करावा. अशी मागणी यावेळी आमदार लांडगे यांनी केली.  तसेच, निगडी, यमुनानगर, कृष्णानगर, ट्रान्सपोर्टनगर, सेक्टर20,21,22,23 व 24 परिसरातील ‘रेड झोन’ची हद्द निश्चितीबाबत अनेक वर्षांपासून प्रश्न प्रलंबित आहे.

या भागातील सुमारे 7  हजार कुटुंबांना बांधकाम परवानगी, महसुली कागदपत्रे, वारस नोंदी याबाबत तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत जिल्हा प्रशासन, संरक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली. याला जिल्हा प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

SBI News : कर्जाचे हप्ते थकवल्यास चॉकलेट घेऊन थेट घरी येणार बँकवाले

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेने नगर रचना विभागामार्फत ‘रेड झोन’ मोजणीबाबत प्रस्ताव नव्याने सादर करावा. (Red Zone) महिनाभराच्या कालावधीत भूमी अभिलेख विभागाने जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने हद्द निश्चित करावी यासाठी भूमि अभिलेख आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने आगामी 1 महिन्यात महापालिका प्रशासनाने रेड झोन हद्द निश्चितीबाबत प्रस्ताव तयार करावा. त्याद्वारे हद्दीची मोजणी करण्यात येईल, असे आवश्वासन दिले आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास स्थानिक मिळकतधारकांना दिलासा मिळेल आणि महापालिका उत्पन्नातही वाढ होईल. त्यामुळे आम्ही सकारात्मक भूमिकेतून पाठपुरावा करीत आहोत, असे आमदार महेश लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.