Khed : किरकोळ कारणावरून आई व मुलाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज- रस्त्याचे काम करत असताना दगड आमच्या जमिनीवर टाकू नका म्हटल्याचा राग आल्याने तिघांनी आई व मुलाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी (दि.4) वाकी खेड (Khed) येथे घडले आहे.

Pune : विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती एकांकिका स्पर्धेचे शुक्रवारी पारितोषिक वितरण

याप्रकरणी संदीप सोपान कड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून विलास मांजरे,पोकलेन चा ड्रायव्हर गणेश मांजरे,सुनील संभाजी कड यांचा मुलगा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची आई हे त्यांचे जमिनीवर थांबले असताना आरोपी हे जमिनीचे खोदकाम करून त्याचे दगड फिर्यादी यांच्या जमिनीवर टाकत होते. यावेळी फिर्यादी यांनी दगड आमच्याbइकडे टाकू नका असे सांगितले , याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत दगड डोक्यात मारून जखमी केले.

फिर्यादी यांच्या आई भांडणे सोडवण्यासाठी मध्ये पडल्या तर फिर्यादीच्या आईला देखील आरोपींनी हाताने दगडाने व लोखंडी गजाने मारले. फिर्यादी यांच्याही गुडघ्यावर मारून त्यांनाही गंभीर जखमी केले. चाकण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.