Pune News : शहरावर धुक्याची चादर! विमान उड्डाणे पुढे ढकलली, सुधारित वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुण्यात धुक्याची गडद चादर पसरली आहे. याचा परिणाम विमानसेवेवर झाला असून, पुणे विमानतळावरुन होणा-या विमान उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आली असून, प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक पहावे अशी विनंती पुणे विमानतळाच्या वतीने करण्यात आली आहे. 

दरम्यान, काही वेळापूर्वी अंधूक प्रकाशामुळे चार विमान उड्डाणाचा मार्ग वळविण्यात आल्याचे विमानतळ अधिका-यांनी म्हटले होते. त्यापैकी दिल्ली ते पुणे येणारी एक फ्लाईट पुण्यात लॅन्ड झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

वातावरण हळूहळू पूर्वपदावर येत असून, दृश्यमानता वाढत आहे. विमानतळ विमानाचे आवागमन सुरू झाले आहे. पण, काही उड्डाणे पुढे ढकलण्यात आली असून, प्रवाशांनी सुधारित वेळापत्रक पहावे, अशी विनंती विमानतळ अधिका-यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.