Nashik News : साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर संमेलनाला जाणार नाहीत !

एमपीसी न्यूज : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे.यासंदर्भात महत्वाचं अपडेट समोर आले असून नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.जयंत नारळीकर संमेलनाला येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

आज शहरातून ग्रंथदिंडी निघाली असून संमेलनस्थळी सकाळी 11 वाजता ध्वजारोहण होईल. मुख्य मंडपात दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मात्र, या सोहळ्याला संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची हजेरी लागण्याची शक्यता कमी आहे.

संमेलनाच्या आयोजन समितीचे त्यांना नाशिक येथे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. नारळीकर हे अनुपस्थित राहतील अशी शक्यता आहे. नारळीकरांच्या भाषणाचा व्हिडीओ दाखवण्यात येणार अशी माहिती मिळत आहे.संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉ. नारळीकर यांना नाशिक येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.