Weather Update : पुण्यासह राज्यातील काही भागात आजही पाऊस पडणार 

एमपीसी न्यूज : ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात – उत्तर कोकण किनारपट्टीलगत चक्रीय चक्रवात आहे. याचा परिणाम म्हणून आज, शुक्रवारीदेखील मुंबईसह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गेल्या चोवीस तासात कोकण गोव्यात ब-याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हवामान कोरडे होते. कोकण गोवा व मराठवाड्यात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

पुणे शहर आणि उपनगरांत बुधवारप्रमाणे गुरुवारीदेखील ओलाव्यामुळे धुके निदर्शनास आले असून, शुक्रवारीदेखील येथे धुक्याची चादर कायम राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही धुके जाणवू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

या जिल्ह्यांत पाऊस
३ डिसेंबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, बीड, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद.
४ डिसेंबर : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.