BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: संक्रातीच्या दिवशी सोनसाखळी लांबविणारा चोरटा गजाआड

सात लाखांचे सोने जप्त; दहा गुन्हे उघड

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – गतवर्षीच्या मकर संक्रातीच्या दिवशी शहरात सोनसाखळी चोरी करणा-या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा दोनच्या पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून सात लाखांचे सोने जप्त करण्यात आले असून सोनसाखळीचे दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सोमनाथ मधुकर चोबे (वय-31 रा.श्रीरामपूर, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी सोमनाथ चोबे याला श्रीरामपूर येथे बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. तसेच आरोपीवर तळेगाव दाभाडे पोलिसांनी मोकाची कारवाई केल्यामुळे त्याला तळेगाव पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले होते. गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांना गतवर्षीच्या संक्रांतीच्या सणाला सोनसाखळी चोरी करणारा आरोपी चोबे असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चोबेकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

यामध्ये देहुरोड, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, निगडी अशा पोलीस ठाण्यात दहा गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. अहमदनगरला राहणारा चोबे हा छैल्या याचा साथीदार असून तो सणाच्या दिवशी शहरात येत होता आणि दुचाकीवरुन दागिने चोरत होता. त्याच्या सोबत त्याने शहरात हे गुन्हे केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी 7 लाख 68 हजार रुपयांचे 240 ग्रॅम वजनाचे दागीने जप्त केले आहेत. चोबे याच्याकडे कामधंदा नसल्याकारणाने त्याने कर्ज काढले होते. हे कर्ज फेडण्यासाठी चोबे हा चोरी करत होता. चोरलेले दागीने चोबे हा किरकोळ किंमतीत सोनारांना विकत होता. त्यानुसार अहमदनगर आणि मध्यप्रदेश येथील सोनारांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.