Pimpri : पीएमपीएमएल बसमधून महिलेचे दीड लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलमधून प्रवास करणा-या महिलेच्या बॅगेतील दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. ही घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कात्रज ते मोरवाडी या दरम्यान घडली.

याप्रकरणी पुजा निलेश फडतरे (वय 24, रा. साई समर्थ सोसायटी, आंबेगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा या शुक्रवारी कात्रज येथून पीएमपीएमएल बसमधून मोरवाडी येथे येत होत्या. प्रवासात त्यांच्या बॅगेतील अज्ञात चोरट्याने तीन तोळ्याचा राणी हार, सोन्याचे गंठन, 1 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा असा 1 लाख 43 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. फौजदार निमगिरे तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.