Aalandi : आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्र.1 चे 5 वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश

एमपीसी न्यूज-आळंदी नगरपरिषद शाळा क्र. 1 च्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य (Aalandi) परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या 5वी  साठी घेण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती 202ं3 परीक्षेत उज्वल य़श संपादन केले आहे.

Pune News : ‘कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद 

 परीक्षेला बसलेल्या 12 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थी पात्र ठरले. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुक्ता नरवडे -250 गुण,सुदर्शन भुंबर – 228 गुण,राजू आघाव – 210 गुण ,आकाश ओलेकर-210 गुण,अनिकेत सुतार-194 गुण,भक्ती आव्हाड -170 गुण,योगेश्वरी रोड – 168 गुण,ज्ञानेश्वरी ढगे – 156 गुण,राधिका केंद्रे – 144 गुण मिळवुन या विद्यार्थ्यांनी  मेहनतीने उज्वल यश संपादन केले आहे.

Pune News : ‘कवितेस कारण की..’ कार्यक्रमाला पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद

या विद्यार्थ्यांना राजेश कराळे  यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संतोष मरभळ  ,तसेच प्रशासन अधिकारी मा. लांडे  व्यवस्थापन समिती अध्यक्ष  गणेश ननवरे यांनी अभिनंदन केले. त्याच बरोबरच सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा व्यवस्थापन समिती, सर्व ग्रामस्थ व  पालक वर्गातर्फे  शुभेच्छा देऊन कौतुक आणि  हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
यापुढील काळातही शिष्यवृत्तीची दैदीप्यमान परंपरा (Aalandi) आळंदी नगर परिषदांच्या शाळांमध्ये चालू राहील असा आशावाद ग्रामस्थ व पालकांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.